अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:- संगमनेर तालुक्यातील मेंढवण शिवारातील कार्थळवाडी परिसरात दरोडेखोरांनी एका शिक्षकाच्या घरावर दरोडा टाकला आहे.
दरोडेखोरांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून 3 लाख 21 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याबाबत अधिक माहिती अशी कि, मेंढवण शिवारात कार्थळवाडी या ठिकाणी शिक्षक हरिश्चंद्र बाजीराव काळे यांची वस्ती आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2019/11/Chori-01-1-1.jpg)
रात्रीच्यावेळी काळे दाम्पत्य घरात झोपलेले होते. दरम्यान रात्री अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी काळे यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला.
चोरट्यांजवळ कुलूप तोडण्याचा लोखंडी पान्हा, गज, दांडके, स्क्रू ड्रायव्हर असे साहित्य होते. दरोडेखोरांनी हरिश्चंद्र काळे यांना मारहाण केली.
व घरातील सोन्याचे दागिने असा एकूण सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. त्यानंतर दरोडेखोर स्विफ्ट कारमधून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
तसेच तातडीने घटनास्थळी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. श्वानाने मुख्य रस्त्यापर्यंतच माग काढला. हरिश्चंद्र काळे यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर अधिक तपास करीत आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|