अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:- बाळासाहेब पवार स्मृती करंडक स्पर्धेचा अंतिम सामना हुंडेकरी स्पोर्टस अँकडमी विरुद्ध श्री समर्थ क्रिकेट अँकडमी यांच्या दरम्यान झाला. समर्थ क्रिकेट अँकडमी संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्विकारली. समर्थ क्रिकेट अँकडमी ४० षटकात ९ बाद २३२ धावा केल्या .
शुभम लोहार ७६ धावा, अमर भांडवलकर ५६ धावा , ओम पाटील२३ ,धावा ,जयेश जायभाय १६ , स्वरूप मोरे याने १३ धावा केल्या . हुंडेकरीच्या रोनक अंदाणीने ४७ धावात ३ बळी तर राहुल गुरसाळीने ३१ धावात २ बळी घेतले. हुंडेकरी अँकडमी संघाने ३९.५ षटकात सर्वबाद २०१ धावा केल्या राहुल गुरसाळी ४२ धावा ,
श्रेयस काकडे २९ धावा ,तांबटकर नोमान १९ धावा ,झैहद खान १८ धावा , प्रत्युष भास्कर १७ धावा केल्या समर्थच्या यश सानप ,शुभम लोहार ,साहील नलगे यांनी प्रत्येकी दोन ,दोन बळी घेतले. समर्थ संघाने हा अंतिम सामना ३१ धावांनी जिंकून बाळासाहेब पवार स्मृती करंडक आपल्या कडे खेचुन आणला.
आंजनेय प्रतिष्ठानतर्फे आयोजित बाळासाहेब पवार स्मृती करंडक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत १६ वर्षाखालील गटात समर्थ संघाने अजिंक्यपद मिळविले. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी सीजी कंपनीचे नितीन ढगे,सुजय दरेकर ,जिल्हा क्रिकेट असो.चे गणेश गोंडाळ, पत्रकार महेंद्र कुलकर्णी, दगडू पितळे,डॉ.अमित सपकाळ, जगन्नाथ ठोकळ,मकरंद घोडके,सचिन मेहता,गौतम शिंगी, आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीस बाळासाहेब पवार यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी आ. संग्राम जगताप म्हणाले की, नगरमध्ये क्रिकेटचे खेळाडू घडविण्यात क्राँम्पटन व बाळासाहेब पवार यांचे अतुलनीय योगदान आहेच यात शंकाच नाही.
युवा पिढीला घडविण्याच्या ध्येयाने क्रिकेट साठी कार्य केले बाळासाहेब पवार यांच्या नावाने सुरु असलेली हि स्पर्धाही देशालाउत्तम खेळाडू देतील असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला.
विजेत्या संघाचे अभिनंदन करून ते म्हणाले की,सातत्याने सराव करा,खिलाडूवृत्ती जोपासून चिडचिड,राग या पासून दूर रहा. स्पर्धेसाठी व कार्यक्रम यशस्वीतेसाठी अरुण नाणेकर,संदीप पवार,सोमनाथ नजान,विनोद पटेल,चैतन्य खोलगडे, ,प्रशांत अंतापेलू,सार्थक ख्रिस्ती,शरद नरसाळे,यांचे अतुलनीय योगदान लाभले. सूत्रसंचालन कपिल पवार यांनी केले. सुभाष येवले यांनी आभार मानले.
स्पर्धेचे धावलेखक म्हणून अजय कविटकर, तर पंच म्हणून प्रेम कांबळे, विशाल कांबळे यांनी काम पहिले.
निकाल – सामनावीर शुभम लोहार. स्पर्धेतील वैयक्तिक बक्षिसे –
उदयुन्मुख खेळाडु -ईरफान सय्यद , प्रियदर्शनी अँकडमी
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – आकाश विश्वकर्मा ,हुंडेकरी अँकडमी
उत्कृष्ट फलंदाज – अरपित त्रिभुवन ,बालाजी क्रिकेट अँकडमी
उत्कृष्ट गोलंदाज -यश सानप ,समर्थ क्रिकेट अँकडमी
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू -साहिल नलगे ,समर्थ क्रिकेट अँकडमी
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|