आ.बबनराव पाचपुते म्हणाले नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:-महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, राज्यात बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांवर वाढत चाललेले अत्याचार, व यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेल्या भ्रष्टाचारी सरकाराविरोधात आ. बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी श्रीगोंदा यांच्या वतीने आज सोमवार दि. २२ मार्च 2021 रोजी सकाळी ११.०० वाजता श्रीगोंदा शनीचौक येथे मुख्यमंत्री व गृहमंत्री महाराष्ट्र यांनी नैतीक जबाबदारी स्विकारून राजीनाम्याची मागणी करण्यासाठी निदर्शने व आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार बबनराव पाचपुते म्हणाले की, सरकार मधील मंत्री विकासकामे सोडुन खंडणी गोळा करण्याचे काम करत आहेत.

तर काहींवर महिलांवरील अत्याचारा सारखे गंभीर आरोप झालेले आहेत तरी देखील या निगरगट्ट सरकार ला जाग येत नाही. परंतु जनतेच्या मनातील भावना ओळखुन भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही.

यांनी राजीनामा न दिल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा हि पाचपुते यांनी दिला. यावेळी बाळासाहेब महाडिक, संतोष रायकर, संदीप नागवडे,

नगरसेवक रमेश लाढाणे, संतोष खेतमाळीस, बापुतात्या गोरे, अशोक खेंडके, राजेंद उकांडे, जयश्रीताई कोथींबीरे, सुहासिनी गांधी, शहाजी खेतमाळीस, सुनील वाळके,

संग्राम घोडके, अंबादास औटी, संतोष क्षिरसागर,सुधीर खेडकर, महेश लांडे, महावीर पटवा, दिपक हिरनावळे, महेश क्षीरसागर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe