अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:-देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा फोफावत आहे. यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. तसेच कोरोनाला अटकाव करण्यासाठी अनेक उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
यातच परभणी जिल्ह्यात बससेवेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे आंतरजिल्हा आणि जिल्ह्याअंतर्गत एसटी सेवा आजपासून 31 मार्चपर्यंत पुर्णपणे बंद असणार आहे.
रोज साधारणतः जिल्ह्यातून 800 ते 900 बस फेऱ्या होत असतात, त्या आता बंद झाल्या असल्यामुळे एसटी महामंडळाला रोज 30 लाखांचे नुकसान सहन करावे लागणार आहे.
याशिवाय हॉटेल्स, रेस्टारंट, चहाच्या टपऱ्या, पानपट्टी धारक यांनाही आपली दुकाने बंद ठेवून केवळ पार्सल सुविधा देता येणार आहे. एकूणच वाढत्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील निर्बंध हे अधिकपणे कडक करण्यात आले आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या परभणी जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे प्रशासनाने कडक पाऊले उचलायला सुरुवात केली आहे.
याच पार्श्वभूमीवर 18 मार्चला एसटी बसला तब्बल एक लाख रुपयांचा दंड केला होता. परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा लाल परीची चाके थांबली आहेत. आजपासुन 31 मार्चपर्यंत एसटी सेवा पुर्णतः बंद करण्यात आली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|