अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:-कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या गतीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहे.
संगमनेर तालुक्यातील कुरण येथील लग्न समारंभात नियमांपेक्षा जास्त गर्दी आढळून आल्याने आयोजकाला १० हजार रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला आहे.
या समारंभासाठी १०० पेक्षा अधिक नागरिक उपस्थित होते. नियमापेक्षा अधिक गर्दी असल्याने पोलीस उपनिरीक्षक आर.ए. माळी यांनी पथकासह कारवाई केली.
या कारवाईमुळे ग्रामीण भागातील विवाह सोहळ्यातील गर्दीवर नियंत्रण येण्यास मदत होईल. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना प्रशासनाने दिलेल्या नियमांचे नागरिक पालन पालन करीत नाही.
त्यामुळे प्रशासनाने कारवाईचा बडगा हाती घेतला आहे. जिल्हाधिकारी यांनी दोन दिवसांपूर्वी तालुका भेट देऊन कडक कारवाईचे आदेश त्यांनी दिले आहेत.
वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन न आढळल्यास कारवाईस नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे. तसेच शहरात फिरताना व गर्दीच्या ठिकाणी मास्क सक्तीचे करण्यात आले आहे.
याचा भंग करणाऱ्यांकडून दंड आकारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. विनाकारण शहरात फिरणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|