अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी एपीआय सचिन वाझेंना 100 कोटी रुपयांचं दर महिन्याला टार्गेट दिलं होतं, या दाव्याने महाराष्ट्राचं पोलिस दल तसंच राजकीय वर्तुळही हादरले.
मात्र गृहमंत्री अनिल देखमुख यांच्यावर होणारे हे आरोप मनाला न पटणारे आहेत. या आरोपांमध्ये तथ्य नाही, असे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पिंपरी चिंचवडला भयमुक्त करणं हे आमचं टार्गेट आहे. पिंपरी चिंचवड शहरातील अवैध धंद्यातून वसुलीसंदर्भातलं पत्र व्हायरल झाले.
त्या संबंधित प्रकरणाचा तपास सीआयडीकडे आहे. त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणार नाही, असं कृष्णप्रकाश म्हणाले. शहरात कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही.
गुन्हेगार कोणत्याही पक्षाचा असो… तो सरकारचा समर्थक असो वा विरोधातला, त्याच्याशी पोलिसांचा संबंध नाही. कारण गुन्हेगार हा फक्त गुन्हेगार असतो, त्याने केलेल्या चुकीचं शासन त्याला होईल, असंही कृष्णप्रकाश म्हणाले.
राज्याचा गृहमंत्री एका एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्याला 100 कोटी रुपयांचं टार्गेट देईल, ही गोष्ट मनाला पटत नाही. चुकीचं काम करणाऱ्यांना टार्गेट दिलं जाते, असे कृष्णप्रकाश यांनी सांगितलं.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|