कांदा, लसूण, बटाटा घसरला वाचा अहमदनगर जिल्ह्यातील बाजारभाव !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- सध्या राज्यातील बदलते वातावरण, वादळी वारे, अवकाळी पावसाने लावलेली हजेरी यामुळे भाजीपाला आवकेवर त्याचा परिणाम झाला आहे.

भाजीपाला दरातील वाढ अद्यापही कायम आहे. परंतु स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या असलेल्या कांदा, लसूण आणि बटाटा, शेवग्याच्या दारांत आवक वाढल्याने घसरण झाली आहे.

मटारच्या दरात वाढ झाली असून, अन्य फळभाज्यांचे दर स्थिर आहेत. सोमवारी अहमदनगर बाजार समितीत मेथी, कोथिंबीर,शेपू, कांदापात, करडई, पुदिना, मुळे, राजगिरा, चुका आणि हरभरागड्डीचे दर स्थिर आहेत.

बाजार समितीत काल कोथिंबिर आणि मेथीची मोठी आवक झाली. मेथी, कोथिंबीरीच्या दरात घाऊक बाजारात गड्डीमागे तीन रुपये आणि पालक प्रत्येकी एक रुपयाने महागली आहे.

संत्रा, मोसंबी, कलिंगड आणि लिंबू आणि डाळिंबाच्या दरांत वाढ झाली आहे. उन्हाचा चटका वाढल्याने थंडगार फळांना मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे कलिंगड आणि खरबुजाला मागणी वाढली आहे.

संत्र्याच्या दरात ४० टक्क्यांनी, तर मोसंबी २० टक्क्यांनी महागली आहे. लिंबाच्या दरात गोणीमागे १०० ते १५० रुपयांची वाढ झाली आहे. डाळिंबाची आवक कमी होत असल्याने सध्या डाळिंबाला चांगला भाव मिळत आहे.

बाजार समितीत मिळालेले दर (क्विंटलमध्ये) पुढीलप्रमाणे :- टोमॅटो ५०० – ८००, वांगी ५०० – १५००, कोबी २०० – ५००, काकडी १००० – २०००,गवार २००० – ८०००, दोडका २५०० – ३०००, घोसाळे २००० – २५००, कारले २५०० – ३०००, भेंडी २५०० – ३०००, वाल २००० – २५००, बटाटे ५०० – १०००,

हिरवी मिरची २५०० – ४४००, लसूण ३००० – ७०००, शेवगा १००० – २०००, लिंबू ४५०० – ६०००, मेथी ४०० – ५००, कोथिंबीर ४०० – ७००,पालक ६०० – ७००,शेपू भाजी ४०० – ६००, वाटाणा २००० – ४५००. फळे : मोसंबी २००० – ८०००,संत्रा १००० – ९०००,डाळिंब २००० – १६०००, पपई ८०० – १२००,सफरचंद ७००० – १२०००.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe