नवी दिल्ली : दिल्ली व एनआरसीमधील वाढत्या प्रदूषणाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल राजकारण करत असल्याचा आरोप करत, केंद्रीय पर्यावरण मंत्री जावडेकर यांनी आप सरकारला लक्ष्य केले.
वाढते प्रदूषण रोखण्यासाठी पंजाब व हरियाणाच्या मुख्यमंर्त्यांना पत्र लिहिण्याचे आवाहन मुख्यमंत्री केजरीवाल यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना केल्यानंतर जावडेकर यांनी केजरीवाल यांच्यावर तोफ डागली.

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आरोप-प्रत्यारोपात गुंतणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे स्पष्ट करताना जावडेकर म्हणाले की, राजधानीतील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र, केजरीवाल या गंभीर समस्येचे राजकारण करत आहेत.
हरियाणा व पंजाब मुख्यमंर्त्यांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न करत असून, पत्र लिहिण्याचे आवाहन करून विद्यार्थ्यांना भडकावीत आहेत. मागच्या १५ वर्षांपासून वायु प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर मोदी सरकारतर्फे उपाययोजना करण्यात येत आहे.
केंद्र सरकारने प्रदूषणाच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी एनसीआरचे मंत्री व अधिकाऱ्यांची आंतरराज्य बैठक सुरू केली आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.
दिल्ली सरकारने जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करण्याऐवजी चांगल्या कार्यासाठी निधी खर्च करावा. केजरीवाल सरकारने जाहिरातींवर १५०० कोटी रुपये खर्च करण्याऐवजी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पंजाब व हरियाणातील शेतकऱ्यांना मशिन खरेदी करण्यासाठी निधी द्यायला हवा होता. असे केले असते तर नक्कीच दिल्लीतील प्रदूषणावर नियंत्रण मिळण्यासाठी मदत झाली असती, असे यावेळी जावडेकर यांनी स्पष्ट केले.
- महाबळेश्वरमध्ये जाणाऱ्या पर्यटकांसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय !
- ‘हे’ झाड चुकूनही घराशेजारी लावू नका, नाहीतर साप तुमच्या घरीच मुक्कामाला असणार; या झाडाला म्हणतात सापाचे दुसरे घर
- MCX Report : सोन्याच्या वायद्यात ३,२२१ रुपये आणि चांदीच्या वायद्यात ३,४४२ रुपयांची वाढ
- टाटा मोटर्सचा मास्टरप्लॅन ! 2025 मध्ये नव्या सात गाड्या लाँच करण्याची तयारी, पहा संपूर्ण यादी
- DRDO Bharti 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटना अंतर्गत सायंटिस्ट पदाची भरती सुरू; त्वरित अर्ज करा