अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार असणार्या बाळ बोठे याला पोलिसांनी हैदराबाद येथून ताब्यात घेतले. आरोपी बोठे याच्या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला आज दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.
न्यायालयाने आरोपी बोठेच्या पोलिस कोठडीत वाढ केली असून बोठेला अजून दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. आरोपी बोठे गुन्हा घडल्यानंतर हैदराबादला जाण्यापूर्वी कुठे- कुठे फिरला याचा तपास करणे बाकी आहे.
बोठे याला हैदराबादमध्ये पोहचण्यापूर्वी कोणी मदत केली. गुन्ह्यातील फरार आरोपी पी अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी हिने बोठेला काय मदत केली,
याचा तपास करणे बाकी असल्याने आरोपीला पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी केली. दरम्यान आरोपी बोठेच्या वकिलांनी न्यालयात आपले मुद्दे मांडले.
बोठेचे वकील म्हणाले कि, आरोपीस तपासासाठी वेळोवेळी पुरेसा वेळ दिलेला आहे. आजपर्यत म्हणजे 12 दिवसांपासून आरोपी पोलिस कोठडीमध्ये आहे.
गेल्या बारा दिवसांमध्ये आरोपीने पोलिसांस त्याचेकडे असणारी संपूर्ण माहिती दिलेली आहेदोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकुण घेतल्यानंतर न्यायालयाने बोठेला 25 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावणी आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|