नवी दिल्ली : देशात पाच कोटींपेक्षा अधिक नवीन सदस्य जोडण्याची उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी काँग्रेसने एक विशेष ॲप तयार केले आहे. याअंतर्गत आपल्या नवीन सदस्याची विस्तृत माहिती संकलित के ली जाणार आहे. ही माहिती नवीन सदस्याचा वर्ग आणि व्यवसायाच्या आधारे तयार केली जाणार आहे.
काँग्रेस सदस्यता अभियानाशी निगडित सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाकडून तयार करण्यात आलेल्या या ॲपचे नाव ‘ऑफिशियल आयएनसी मेंबरशिप’ असे ठेवण्यात आले आहे. या ॲपला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची मंजुरी मिळाली असून याची सुरुवात सोमवार ४, नोव्हेंबरपासून होत आहे.

काँग्रेस भाजपाप्रमाणे मिस्ड कॉलच्या माध्यमातून नव्हे, तर या ॲपच्या माध्यमातून वास्तविक सभासद बनवण्यास सुरुवात करत आहे. सुरुवातीच्या काळात छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि गोवा या राज्यांत सदस्यता अभियानाची सुरुवात केली जात आहे.
यानंतर देशाच्या दुसऱ्या राज्यातही या ॲपला सुरुवात केली जाणार आहे. या ॲपच्या माध्यमातून काँग्रेसची सदस्यता घेणाऱ्या व्यक्तीचा प्रथम मोबाईल नंबर ॲपमध्ये टाकला जाईल आणि नंतर त्याचा फोटो घेतला जाईल. यानंतर कॅटेगिरी, व्यवसायाचे कॉलम भरले जातील.
यानंतर त्याचा सदस्यत्वाचा फॉर्म सबमिट केला जाईल. या ॲपमध्ये जनरल, ओबीसी,एससी, एसटी,अल्पसंख्याक आणि इतर असे कॉलम असणार आहेत. ॲपच्या माध्यमातून एक विस्तृत डेटाबेस तयार करत आहे.
- महाबळेश्वरमध्ये जाणाऱ्या पर्यटकांसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय !
- ‘हे’ झाड चुकूनही घराशेजारी लावू नका, नाहीतर साप तुमच्या घरीच मुक्कामाला असणार; या झाडाला म्हणतात सापाचे दुसरे घर
- MCX Report : सोन्याच्या वायद्यात ३,२२१ रुपये आणि चांदीच्या वायद्यात ३,४४२ रुपयांची वाढ
- टाटा मोटर्सचा मास्टरप्लॅन ! 2025 मध्ये नव्या सात गाड्या लाँच करण्याची तयारी, पहा संपूर्ण यादी
- DRDO Bharti 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटना अंतर्गत सायंटिस्ट पदाची भरती सुरू; त्वरित अर्ज करा