अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये टू प्लस मधील सर्व आरोपींची प्रत्यक्ष पाहणी करून पुन्हा गुन्हे केल्यास कारवाई केली जाईल .
अशी तंबी नगर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी राजेंद्र सानप यांनी दिली. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात टू प्लस अंतर्गत गुन्हेगारांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
नगर तालुका पोलिस स्टेशनमध्ये सोमवारी या टू प्लस मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात नगर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी राजेंद्र सानप यांनी उपस्थित काही आरोपींना महिन्यातून एकदा नगर तालुका पोलिस ठाण्यात हजेरी लावण्यास सांगितले.
कार्यक्रमाला नगर तालुक्याचे पोलीस अधिकारी राजेंद्र सानप, स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे आदीसह नगर तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
स्नेहबंधचे अध्यक्ष शिंदे म्हणाले, गुन्हा करण्यापासून दूर रहा, काही चुकीचे वाटले तर पोलिस स्टेशनला येऊन त्याबाबत सांगा, असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी केले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|