नगर-कल्याण रोडवर अपघातात एकाचा मृत्यू !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-नगर-कल्याण रोडवरील धोत्रे शिवारात एका भरधाव वेगातील कारने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात १ जण ठार झाला आहे.

गोरख रावसाहेब डोईफोडे (वय २८) असे अपघातात मृत पावलेल्या इसमाचे नाव आहे. रेवणनाथ रावसाहेब डोईफोडे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पारनेर पोलिस ठाण्यात २२ मार्च रोजी अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

गोरख डोईफोडे मोटारसायकलवरुन जात असताना भरधाव वेगातील कारने जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला. पुढील तपास पोना. मोढवे हे करत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe