ज्येष्ठ नागरिकांना एसबीआयकडून मोठे गिफ्ट ; घ्या अधिक व्याज

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-बँकेने मे महिन्यात एसबीआय व्हीकेअर सीनियर सिटीजन्स टर्म डिपॉजिट स्कीम जाहीर केली होती, जी जी सुरुवातीला सप्टेंबरपर्यंत होती.

त्यानंतर त्याची मुदत डिसेम्बरपर्यंत वाढविली. त्यानंतर ही योजना पुन्हा 31 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आली. परंतु पुन्हा एकदा ती 30 जून 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत अधिक व्याज मिळेल :- साथीच्या रोगाच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना उच्च व्याज दरासाठी विशेष एफडी योजना सुरू केली होती. बँकेने विशेष एफडी योजना तीन महिन्यांसाठी 30 जून पर्यंत वाढविली आहे. एक स्पेशल एसबीआय व्हीकेअर ठेव योजनेत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या ठेवींवर जास्त व्याज दिले जाते.

या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 0.30 % जादा व्याज मिळते. त्याच बरोबर एसबीआय सर्व मुदत ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना आधीपासूनच 0.50 % जादा व्याज देत आहे. अशा प्रकारे, एसबीआय व्हीकेअर ठेवीचा लाभ घेऊन ज्येष्ठ नागरिक त्यांच्या एफडीवर 0.80 (0.50+0.30) टक्के अधिक व्याज घेऊ शकतात.

स्पेशल फिक्स्ड डिपॉजिट स्कीमची वैशिष्ट्ये :-

  • – 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. ही योजना 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी आहे.
  • – मैच्योरिटी होण्यापूर्वी पैसे काढल्यास अतिरिक्त व्याज मिळणार नाही.
  • – एसबीआय व्हीकेअर ठेवीअंतर्गत नवीन एफडी खाते उघडणे किंवा जुन्या एफडी नूतनीकरण या दोहोंवर जास्त व्याजाचा फायदा होईल.
  • – एसबीआयची ही योजना आता 30 जून 2021 पर्यंत खुली आहे.

बँकेने अलीकडेच एफडीचे दर बदलले आहेत :- एसबीआय सर्वसामान्यांना 5 वर्षांच्या एफडीवर 5.4% व्याज देत आहे. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने विशेष एफडी योजनेत निश्चित ठेव ठेवली असेल तर एफडीला लागू असणारा व्याज दर 6.20 टक्के असेल.

7 दिवस ते 10 वर्षाच्या मुदत ठेवींवर सर्वसाधारण नागरिकांना बँक 2.9% ते 5.4% व्याज देते. 8 जानेवारी 2021 रोजी बँकेने अखेरचे एफडी दर बदलले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe