श्रीगोंदा तालुक्यात विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- बुधवारी रात्री सात वाजता श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथे विजेच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस कोसळला तर तालुक्यातील कोळगाव, कोरेगाव या भागात वादळी वाऱ्यासह हलकासा पाऊस पडला.

या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना हाता तोंडाशी आलेले पीक वाचविताना मोठी कसरत करावी लागली.

राज्यातील अनेक भागात दि.२४ तारखेपासून राज्यावर ढगाळ हवामानासह वादळी पावसाचे आणि काही प्रमाणात गारपिटीचे सावट असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला होता.

बुधवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास चिखली परिसरात विजेच्या कडकडटासह वादळ सूरू होऊन गारांचा पाऊस सुरू झाला.

सुमारे १५ ते २० मिनिटे चाललेल्या गारांच्या पावसात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागांचे, तसेच कांद्याचे मोठया प्रमानात नुकसान झाले आहे.

तर तालुक्यातील कोळगाव, कोरेगाव या भागात वादळी वाऱ्यासह हलकासा पाऊस पडला. वादळामुळे कोळगाव, सुरेगाव, घुटेवाडी, सह अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर