राहता तालुक्यात 72 तासात 260 कोरोनाबाधितांची नोंद

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:-दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. बर्‍याचअंशी नागरिक काळजी घेताना दिसून येत नाहीत. सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे असताना चौका -चौकांत गर्दी करून राहत असतात. तर अनेकांच्या तोंडाला मास्क नाहीत.

यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना फोफावू लागला आहे. यातच धाकादायकबाब म्हणजे राहाता तालुक्यात 3 दिवसांत 260 हुन अधिक रुग्ण करोना पॉझिटीव्ह निघाल्याने सर्व सरकारी कोव्हिड सेंटर फुल्ल झाल्याने नविन रुग्णांच्या चिंतेत भर पडली असून

अनेक रुग्णांना उपचाराअभावी घरी थांबावे लागत आहे. प्रशासनाने तातडीने शिर्डीचे कोव्हिड सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू करावे,अशी मागणी नागरिक करत आहेत.

गेल्या 15 दिवसांपासून राहाता तालुक्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून सोमवार, मंगळवार व बुधवार या तीन दिवसांत तालुक्यात 260 जणांना करोनाची बाधा झाली. यामध्ये सोमवारी सर्वाधिक 111 जणांना करोनाची बाधा झाली.

मंगळवारी 76 तर बुधवारी 72 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहेत. सध्या राहाता तालुक्यात 474 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून 142 रुग्ण शिर्डी, लोणी व राहाता येथील खाजगी करोना सेंटरमध्ये उपचार घेत असून मोठ्या प्रमाणावर रुग्ण घरीच होमक्वारंटाईन आहेत.

शिर्डीचे करोना सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू होत असून यासाठी सरकारी डॉक्टरांबरोबर 20 कंत्राटी वैद्यकीय पथकाला मान्यता दिली आहे गुरूवारपासून शिर्डीचे करोना सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू होत असून येथे 300 रुग्णांवर उपचार होऊ शकतील.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe