फक्त ११९ रुपयात गॅस सिलिंडर मिळेल ! मात्र त्यासाठी ‘हे’ आहे गरजेचे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:-सध्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमती  गगनाला भिडल्या आहेत. या वर्षी अनुदानित सिलिंडरची किंमत २२५ रुपये प्रति सिलिंडर एवढी वाढली आहे.

दिल्लीत अनुदानित १४.२  किलोच्या सिलिंडरची किंमत ८१९ रुपयांवर पोहोचली आहे. पण पेटीएम तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आलं आहे, त्याअंतर्गत तुम्ही फक्त ११९  रुपयांमध्येच सिलिंडर घेऊ शकता.

म्हणजे तुम्हाला तब्बल ७००  रुपये कॅशबॅक मिळेल. पेटीएम अँपच्या माध्यमातून प्रथमच एलपीजी गॅस सिलिंडर बुक करणार्‍या ग्राहकांना ७००  रुपयांपर्यंतची ही कॅशबॅक मिळू शकेल. हे कॅशबॅक ऑफर ३१  मार्च २०२१  पर्यंतच असणार आहे.

म्हणजेच, स्वस्त एलपीजी सिलेंडर खरेदी करण्यासाठी आपल्याकडे फक्त ७  दिवस शिल्लक आहेत. बुकिंगच्या २४  तासांच्या आत तुम्हाला कॅशबॅक स्क्रॅच कार्ड मिळेल. हे स्क्रॅच कार्ड ७  दिवसांच्या आत वापरावे लागेल.

गॅस खरेदी करताना ५०  रुपये वाचवले जाऊ शकतात. त्यासाठी इंडियन ऑईलने खास ऑफर सांगितली आहे. इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार इंडियन ऑईल म्हणजेच इंण्डेन या कंपनीचा गॅस खरेदी केल्यांतर ५० रुपये कॅशबॅक मिळू शकतो.

त्यासाठी सिलिंडरची बुकिंग अ‌ॅमेझॉनपे च्या माध्यमातून करावी लागेल. अ‌ॅमेझॉन पेच्या माध्यमातून गॅस बुकिंग केल्यानंतर अ‌ॅमेझॉनतर्फे५०  रुपये कॅशबॅक मिळतील.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe