अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:-ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
‘महाराष्ट्र भूषण’ हा महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित असा पुरस्कार मानला जातो. एखाद्या क्षेत्रात बहुमुल्य कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वास या पुरस्कारानं गौरवण्यात येतं.
यावेळी हा सन्मान गायिका आशा भोसले यांना देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली.
या बैठकीस समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर,
सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि सदस्य सचिव सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे हे शासकीय सदस्य तसेच अशासकीय सदस्य सहभागी झाले होते.
निवडीनंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन केले. एक नावाजलेलं व्यक्तीमत्व असलेल्या आशाताई भोसले यांनी असंख्य मराठी आणि हिंदी गाणी गायली असून अनेक भाषांचे त्यांना ज्ञान आहे.
या पुरस्कारावरुन अनेक वाद निर्माण झाले होते. परंतु आता आशा भोसले यांचे नाव जाहीर झाल्यानंतर हा वाद मिटला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|