अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:-सैराट प्रकरणामुळे अनेकदा मुलीच्या घरच्या व्यक्तींकडून कठोर व चुकीची पाऊले उचलली जात असल्याच्या अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत.
असाच एक धक्कादायक प्रकार झारखंडमध्ये घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, २५ ऑगस्ट २०१८ रोजी झारखंडमधे कोडरमा जिल्ह्यातील चंदवारा ठाणे क्षेत्रातील मदनगुडीमध्ये २० वर्षीय सोनी कुमारी या तरुणीची हत्या करण्यात आली होती.
त्या प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. सोनी कुमारी या तरुणीच्या हत्येनंतर तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चितेवरून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला होता.
या प्रकरणात कोडरमा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश रामाशंकर सिंह यांच्या न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी पूर्ण केल्यानंतर १५ मार्च रोजी मृत सोनी कुमारीचे वडील किसून साव,
आई दुलारी देवी, काका सीताराम साव आणि काकी पार्वती देवी यांना दोषी ठरवले होते. दरम्यान आज न्यायालयाने शिक्षेबाबत सुनावणी करताना चारही दोषी आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
मृत सोनी कुमारी हिने आंतरजातीय विवाह केला होता. त्यामुळे तिचे आई-वडील नाराज झाले होते. त्या रागातून त्यांनी सोनीची हत्या केली होती.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|