जळगाव : गर्भवती महिलेची शनिवारी प्रसूती होऊन नवजात बालिकेस जन्म दिला. त्यानंतर प्रकृती गंभीर होऊन रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास विवाहितेचा रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला.
योगिता किसन गाडे (२२) शिवाजीनगर हमालवाडा जळगाव असे मृत महिलेचे नाव आहे. गर्भवती विवाहितेस प्रसूतीसाठी तीन दिवसांपूर्वी कुटुंबीयांनी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.
त्यानंतर प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी उपचाराचे बिल घेत रूग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार शनिवारी दुपारी महिलेस जिल्हा शासकीय रूग्णालयातील प्रसूती वार्डात दाखल करण्यात आले.
उपचार सुरू असताना महिलेने नवजात बालिकेस जन्म दिला. दरम्यान प्रकृती खालावल्याने महिला गंभीर होऊन रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.