अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:- नगर तालुक्यातील नांदगाव येथील ओम भगवती कलाकेंद्राच्या बाहेर सहा जणांच्या टोळीने धुमाकूळ घालत वाहनांचे नुकसान केले.
एकास तलवारीचा धाक दाखवून १२ हजार २५० रूपये लुटले. बुधवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
या प्रकरणी सतीष महेश काळे (वय २८ रा. वाळवणे ता. पारनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात सहा जणांविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर असे की, बुधवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास अनोळखी सहा इसम नांदगावच्या ओम भगवती कलाकेंद्रावर आले. त्यांच्या हातामध्ये तलवार, लाकडी दांडके होते.
त्या टोळक्याने कलाकेंद्राच्या बाहेर लावलेल्या आठ ते नऊ दुचाकी व एक चारचाकी वाहनांची तोडफोड करून नुकसान केले.
त्याठिकाणी असलेल्या सतीष काळे यांना तलवारीचा धाक दाखवून काळे यांच्याकडील रोख रक्कम लुटली व हे टोळके निघून गेले.
या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच नगर ग्रामीणचे उपअधीक्षक अजित पाटील, सहायक निरीक्षक युवराज आठरे यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक निरीक्षक आठरे करीत आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|