अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:-जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत असताना, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण जिल्ह्यात एक आठवड्याचे लॉकडाऊन करण्याची मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली.
या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार राजेंद्र दिवाण यांना देण्यात आले. यावेळी छावा संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष सुरेख सांगळे, जिल्हा दक्षिण सचिव गणेश गायकवाड, राहुल देशमुख,

अच्युत गाडे, मुयर पवार, नितीन पोटे आदी उपस्थित होते. मागील तीन दिवसात जिल्ह्यात पाचशेहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत.
तर दर दिवसाला रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दि. २५ मार्चला विक्रमी तेराशे रुग्ण आढळून आले. शेजारील बीड जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी लॉकडाऊनचा निर्णय घेतला जात आहे.
शासकीय सुट्ट्या येत असल्याने शहरात गर्दी होण्याची संभावना आहे. यामुळे कोरोनाचे झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|