अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:-चार मार्च रोजी रात्री घरातून निघताना मनसुख् हिरेनने त्याच्या पत्नीला सांगितले होते की, तावडे नावाच्या अधिकाऱयास भेटायला जातोय पण ‘अपना पुलिस वाला भी है’ असे सांगत हिरेन यांनी पत्नीला दिलासा दिला होता.
असे सांगून हिरेन घराबाहेर पडले पण दुसऱया दिवशी त्याचा मुंब्रा खाडीत मृतदेह सापडला. या हत्येप्रकरणाचा एटीएसने तपास सुरू केल्यानंतर हिरेन यांच्या पत्नीने सुरुवातीपासून सचिन वाझे याच्यावर संशय व्यक्त केला होता.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2021/03/mansukh-h_202103574055.jpg)
अँटिलिया स्फोटक प्रकरण असो की मनसुख हिरेन यांची हत्या, यात मला बळीचा बकरा बनवला जात असल्याचे
सचिन वाझे बोलत असला तरी या दोन्ही प्रकरणात वाझेच प्रमुख आरोपी असल्याचे खुलासे रोजच्या चौकशीतून समोर येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान वाझेचा सीआययुमधील सहकारी एपीआय रियाज काझी यांची पुन्हा एनआयए कार्यालयात चौकशी करण्यात आली. चार मार्च रोजी विनायक शिंदे याने मनसुख हिरेनला संपर्क साधला होता.
मी कांदिवली क्राईम ब्रँचमधून तावडे बोलतोय असे सांगून त्याने हिरेनला घोडबंदर रोड येथे भेटायला बोलावले होते. त्यावेळी घरातून निघताना हिरेनने त्याच्या पत्नीला ही बाब सांगितली.
रात्रीच बोलावल्याने हिरेनची पत्नी चिंतेत होती. तावडे नावाच्या अधिकाऱयास भेटायला जातोय पण ‘अपना पुलिस वाला भी है’ असे सांगत हिरेन यांनी पत्नीला दिलासा दिला होता. असे सांगून हिरेन घराबाहेर पडले पण दुसऱया दिवशी त्याचा मुंब्रा खाडीत मृतदेहच सापडला.
या हत्येप्रकरणाचा एटीएसने तपास सुरू केल्यानंतर हिरेन यांच्या पत्नीने सुरुवातीपासून सचिन वाझे याच्यावर संशय व्यक्त केला होता.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|