फोन टॅपिंग प्रकरणात ‘या’ बड्या नेत्याची होऊ शकते चौकशी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:-विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत असताना कागद आणि पेन ड्राईव दाखवत ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले होते.

त्यानंतर हे पुरावे फडणवीस यांच्याकडे कसे आले? असा सवाल उपस्थित केला जात होता. त्यानंतर फडणवीस यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती.

आता या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने देवेंद्र फडणवीस आणि रश्मी शुक्ला यांची चौकशी करण्यात येण्याची शक्यता आहे.

रश्मी शुक्ला यांची सध्या केंद्रात सेवाबदली झाली आहे. त्यामुळे त्यांना आधी महाराष्ट्रात बदली करून घेण्याची तयारी राज्य सरकारची असेल. तर फडणवीस यांच्याकडे हे गोपनीय आणि महत्वाचे कागदपत्रे कुठून आले हे देखील फडणवीस यांना स्पष्ट करावे लागेल.

मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक प्रकरणे बाहेर येत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर ‘डेटा बाॅम्ब’ फोडला होता. आता हेच प्रकरण फडणवीस यांच्या अंगलट येताना दिसत आहे.

पुण्याच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांनी अनिधीकृत पद्धतीने 100 हून अधिक मंत्र्यांचे तसेच अधिकाऱ्यांचे फोन टॅप केले होते. या प्रकरणात सरकारने कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरून आता सायबर सेलने अज्ञात व्यक्तीच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

राज्य गुप्तचर आधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून, फोन टॅपिंग प्रकरणात सायबर सेलने अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुप्तचर विभागाचे गोपनीय पत्रे बेकादेशीर रित्या मिळवण्यात आली होती, असं या तक्रारीत म्हटलं आहे.

ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट 1930च्या अंतर्गत असणाऱ्या भारतीय टेलिग्राम अधिनियम 1885 च्या कलम 30 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe