कुंपनच शेत खाते : ज्ञानदान देणाऱ्या संस्थेत आठ लाख रुपयाचा अपहार ?

Ahmednagarlive24
Updated:

मदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:-श्रीगोंदे तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या काष्टीसारख्या गावातील ज्ञानदान देणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या जनता विद्यालय ज्युनिअर काॕॅलेजमध्ये चाललेल्या कारभारातील तपासणीत सुमारे सव्वा आठ लाख रुपयाचा अपहार झाला काय? अशी चर्चा सुरू आहे .

तालुक्यातील प्रतिष्ठित असणाऱ्या काष्टी येथे रयत शिक्षण संस्थेचे जनता विद्यालय व ज्युनिअर काॕॅलेज आहे. याच संस्थेत नुकत्याच झालेल्या अहवाल तपासणीमध्ये येथील मुख्याध्यापक व शिक्षक यांना ८ लाख २५ हजार रुपयेचा हिशेब लागत नाही का,

कारण गेली दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या सुविधासाठी शाळेत नवीन इमारतीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. यासाठी माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी सातारा येथील रयत शिक्षण संस्थेकडून काष्टी

येथील नवीन इमारत बांधकामाला सुमारे ७५ लाख रुपये मंजूर करून इतर रक्कम स्थानिक पातळीवर विद्यार्थी व पालक यांनी लोकवर्गणी जमा करून इमारत बांधण्यासाठी दिली. आता शाळेच्या आवारात सुंदर इमारत झाली.

पण झालेल्या कामाचा हिशेब लागत नाही. खर्च कमी झाला आणि पैसे जास्त गेले. यामुळे शाळेतील मार्च एन्डच्या आॅॕडिटमध्ये सुमारे सव्वा आठ लाखांची तफावत आढळून येत असल्याची माहिती शिक्षकाच्या मार्फत मिळत आहे.

याच शाळेत गेली अनेक दिवसांपासून शिक्षकांचा गलथान कारभार चालु आहे. एक वर्षापूर्वी येथील पालकांनी लोकवर्गणी करून शाळेला ४० हजार रुपयांचा सांऊड सिस्टीम स्पिकर असे इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन

दिल्यानंतर त्या एक महिन्यात चोरीस गेल्या तरी पोलिसात तक्रार दाखल नाही. कोरोना काळात विद्यार्थ्यांना धान्य नियमानुसार मिळाले नाही. कुंपनच शेत खाते, अशी परिस्थिती आहे.

  • ब्रेकींग  बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe