अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:- ऑनलाइन गेम खेळण्यातून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा अवघ्या तीन दिवसात शोध लावून कर्जत पोलिसांनी विदर्भातून आरोपीस अटक करत, या मुलीची सुटका करून पालकांच्या स्वाधीन केले आहे.
याबाबत सविस्तर असे की, दि.२० रोजी आपली अल्पवयीन मुलगी घरात नसल्याचे आई-वडिलांच्या लक्षात आले. त्यांनी आजुबाजूच्या परिसरात शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. याबाबत कर्जत पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2021/03/d658905a-99e5-49ce-8b86-889c20a90b03.jpg)
कर्जत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना घटनास्थळावरून अपेक्षित माहिती मिळात नव्हती. मात्र काही मुलं आणि मुली ऑनलाइन फ्री फायर गेम खेळत होती.
त्यामधून पोलिसांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि गोपनीय आणि तांत्रिक माहितीवरून बाळापूर, जि.अकोला येथे सदर पीडित मुलगी असू शकते अशी माहिती मिळाली. यानंतर तात्काळ सदर ठिकाणी पथक रवाना केले.
रात्री साडेतीन वाजण्याच्या दरम्यान मिथुन पुंडलिक दामोदर( वय २४ वर्ष रा.सगद ता.बाळापूर जि.अकोला) याच्या घरून मुलीला आणि आरोपीला ताब्यात घेऊन कर्जत येथे आणले.
अधिक तपास करता माहिती मिळाली की- फ्री फायर खेळत असताना आरोपी मुलाशी प्रथम मुलीच्या भावाशी ऑनलाइन ओळख झाली.
त्याला ३००० रमपयांचा गेम रिचार्ज केला. तो त्या मुलांसोबत खेळू लागला. काही दिवसात मुलाच्या बहिणीबरोबर सुद्धा फ्री फायर ही गेम खेळू लागला. मुलीशी जास्त बोलण सुरू झाले. गेममध्येच बोलणे, मेसेज सुरू होते.
मुलगी वयाने अतिशय लहान असल्याने तिच्या यातील काहीच लक्षात आल नाही आणि तीला फूस लावून पळवून नेले. कोणताही पुरावा नसताना कर्जत पोलिसांनी ३ दिवसातच या मुलीला अत्यंत शिताफीने शोधून काढले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|