आठ दिवसांत तब्बल सव्वा लाखाचा दंड वसूल

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-नगर शहरासह जिह्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाटय़ाने वाढू लागली.

कोरोनाचा फैलाव नियंत्रणात आणण्यासाठी कोरोना नियमांचे प्रभावी पालन व्हावे, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर आणि मास्कचा वापर व्हावा,

गर्दी नियंत्रणात यावी, यासाठी महानगरपालिकेने कठोर पावले उचलली आहेत. कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी प्रशासन सतर्क झाले असून,

महापालिकेने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून आठ दिवसांत तब्बल सव्वा लाखाचा दंड वसूल केला.

शहरातील या ठिकाणी करण्यात आल्या कारवाया पथकप्रमुख परिमल निकम, संतोष लांडगे, कल्याण बल्लाळ, शशिकांत नजान यांच्या पथकाने शहरातील कापड बाजार,

प्रोफेसर चौक, भिस्तबाग चौक, पाइपलाइन रोड, प्रोफेसर चौक, चितळे रोड, दाळमंडई, माळीवडा, टिळक रोड, वाडिया पार्क,

जुना बाजार, झेंडीगेट, केडगाव, नवी पेठ, दिल्लीगेट, बोल्हेगाव, सावेडी, बालिकाश्रम रोड, भूतकरवाडी, सर्जेपुरा, गंजबाजार, बुरुडगाव रोड,

भाजी मार्केट, मार्केटयार्ड आदी भागांतील दुकाने व सार्वजनिक ठिकाणी ही कारवाई केली. दरम्यान मनपाच्या पथकांनी 17 मार्चपासून नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला.

17 ते 25 मार्च या कालावधीत पथकांनी 226 नागरिकांवर सोशल डिस्टन्स नसणे, मास्कचा वापर न करणे, गर्दी केल्याप्रकरणी तब्बल एक लाख 25 हजारांचा दंड वसूल केला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|