अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- पाथर्डी तालुक्यात शिधापत्रिका शोध मोहीमे अंतर्गत बोगस शिधापत्रिका धारक उजेडात यावेत म्हणून मागील पंधरा दिवसांपूर्वी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार मार्फत प्रत्येक शिधापत्रिका धारकाचा स्थानिक रहिवासी असल्याचा पुरावा
पासपोर्ट फोटोसह आधारकार्ड वीजबिलाची झेरॉक्ससह अनेक कागदपत्रे जोडून तो फार्म शिधापत्रिका धारकांनी स्वस्त धान्य दुकानदारकडे जमा केले.
हे अर्ज भरून देताना सर्वसामान्यांसह वयोवृद्धांना देखील मोठी धावपळ करावी लागली. परंतु त्यात काही त्रुटी राहिल्याचे म्हणत पुन्हा अशाच पद्धतीचे शासनाकडून छापील आलेले फार्म भरून देण्याची वेळ शिधापत्रिकाधारकांवर आल्याने त्यांच्यामधून संताप व्यक्त केला जात आहे.
पुरवठा विभागाकडून मागील काही दिवसांपूर्वी शिधापत्रिका शोध मोहीम फॉर्म भरण्याचे काम सुरू करण्यात आले होते त्यामध्ये तालुक्यातील प्रत्येक गावातील स्वस्त धान्य दुकानदारा मार्फत शिधापत्रिका धारक कडून
हे फॉर्म भरून घेण्यात आले त्या फार्म सोबत आधार कार्ड वीज बिल व रहिवासी असल्याचे अनेक पुरावे त्या सोबत जोडून ते फार्म स्वस्त धान्य दुकानदाराकडे सुपूर्द करण्यात आले.
एक फॉर्म भरून देण्यासाठी प्रत्येक शिधापत्रिका धारकाला किमान पन्नास रुपये खर्च आला. सर्व फार्म गोळा करून ते तहसील कार्यालयात स्वस्त धान्य आता दुकानदाराकडून वर्ग देखील करण्यात आले.
त्यानंतर आता पुन्हा एकदा शासनाकडून छापील आलेल्या फार्म सोबत अशाच पद्धतीची माहिती पुन्हा एकदा भरून देण्याची वेळ शिधापत्रिकाधारकवर आली असल्याची माहीती समजली असून या कोरोणाच्या काळात पुन्हा एकदा हे फॉर्म भरून देण्यासाठी शिधापत्रिकाधारक स्वस्त धान्य दुकानांमध्ये गर्दी केल्याशिवाय राहणार नाहीत
त्यामुळे तहसील वाघाने विभागाने शिधापत्रिकाधारकांनी भरून दिलेले फार्मस ग्राह्य धरावेत व एखाद्याच्या फार्ममध्ये चुकीची माहिती आढळून आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी,
अशी भूमिका सामाजिक कार्यकर्ते छानराज क्षेत्रे सतीश सतीश क्षेत्रे यांनी व्यक्त केली आहे. परंतू पुन्हा फार्म भरून देण्याची बिलकुल गरज नाही. याबाबत महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील जाब विचारणार असल्याचेे क्षेत्रे यांनी सांगितले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|