श्रीगोंदा : सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी काल आमदार राहुल जगताप यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली. यावेळी द्राक्ष बागांसाह कांदा, बाजरी, मका तसेच कपाशींच्या पिकांची पाहणी केली.
पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. यावेळी माजी.आ.राहुल जगताप यांनी राज्य तसेच केंद्र सरकार मार्फत नुकसानग्रस्तांना भरपाई मिळून देण्याकरिता प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

नुकसानग्रस्तांचे पंचनामे पूर्ण करून नुकसानीचा अहवाल लवकरात लवकर शासनाला सादर करावा, त्यानुसार शेतकऱ्यांना तातडीने मदत उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आग्रह धरण्यात येईल. असे जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सांगितले.
आज माजी.आ.जगताप यांनी श्रीगोंदा शहरातील पोपट बोरुडे यांच्या शेतातील कपाशीच्या पिकाची पाहणी केली असता. संपूर्ण कपाशीचे नुकसान झाल्याचे आढळून आले तसेच शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची बिले न भरल्याने त्यांची जोडणी पुढील पीक येईपर्यंत वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तोडू नये असे आदेश सरकारने द्यावेत.
अशी मागणी ही यावेळी करण्यात येणार असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांनी फक्त नुकसानीचे अहवाल मागविण्याचे आदेश देऊन भागणार नाही तर जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी तातडीने नुकसानीची प्रत्यक्ष पहाणी करून सरकारला वास्तववादी अहवाल द्यावा. तसेच नुकसान भरपाई मिळून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी मागणीही केली आहे.
- प्रतीक्षा संपली ! अखेर महिंद्रा कंपनीची पहिली 7 सीटर इलेक्ट्रिक Mahindra XEV 9S SUV लॉन्च, मिळणार 500 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज
- PF मधून पैसे काढल्यास कर भरावा लागतो का ? वाचा सविस्तर
- नवले पुलावरील अपघातांची मालिका थांबणार….; पुण्यातील ‘या’ भागात विकसित होणार नवीन रस्ता !
- एसटीप्रमाणे आता रेल्वेने सुद्धा मोफत प्रवास करता येणार…..! ‘या’ लोकांना मिळणार फ्री पास, वाचा सविस्तर
- Aadhar Card बाबत मोठी अपडेट ! ‘या’ 2 कोटी लोकांचे आधार कार्ड झालेत रद्द













