अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- राज्यातील गेल्या 24 तासांतील कोरोनास्थिती जाणून घ्यायची झाल्यास कोरोनाचं विदारक चित्र आपल्यासमोर निर्माण होत आहे.
कारण आज दिवसभरात राज्यात तब्बल 40 हजार 414 नव्या कोरोनारुग्णांची भर पडली आहे. दिवसभरात 17 हजार 874 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.
तर 108 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने राज्यात लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आज राज्यातील 17,847 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत 23,32,453 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्याशिवाय राज्याचा रिकव्हरी रेट 85.95 पर्यंत पोहोचला आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 6933 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून
नाशिक जिल्ह्यात 6773 रुग्ण सापडले आहेत. इतर जिल्ह्यातील रुग्णसंख्येचा आलेख वाढत असल्याचं दिसून येत आहे.
राज्यातील कोविड रुग्णांच्यासंख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स, व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून आज झालेल्या
टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखेअतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या अत्यंत वेगाने वाढत असल्याचे दिसत आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|