नेवासा :- भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा पराभव करून क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख यांनी विजय मिळवला.
आमदार गडाख यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शवून शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे ठरवल्याने त्यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची चिन्हे आहेत.
२०१४ च्या निवडणुकीत गडाख यांचा ४६५९ मतांच्या फरकाने पराभव झाला होता. मुरकुटे हे पंतप्रधान मोदी लाटेत विजयी झाले होते. २०१९ च्या निवडणुकीत गडाख यांना ३०६६१ मताधिक्य मिळाले. संघटन, कौशल्य, नियोजन व जनसंपर्क या बळावर त्यांनी विजय मिळवला.
आता त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याने ते शिवसेनेचे आमदार म्हणून काम करणार आहेत. या वेळी कोणत्याही बड्या नेत्यांची सभा न घेता कार्यकर्त्यांच्या बळावर गडाख यांनी विजय खेचून आणला.
त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला असून जिल्ह्यात एकमेव पर्याय म्हणून आमदार गडाख यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश व्हावा म्हणून कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून पक्ष श्रेष्ठींकडे ठाण मांडले आहे. आता आमदार तर झाले, आता नामदार होणार म्हणून चर्चा सुरू झाली आहे.
- शालेय सहली ठरताहेत ‘एसटी’ ला लाभदायी ! हिवाळ्यातील भ्रमंतीला शाळांचे प्राधान्य, एसटीच्या उत्पन्नात वाढ
- जनतेचे प्रश्न सोडवा अन्यथा बदली करून घ्या ! जलसंपदामंत्री विखे पाटील यांचा इशारा ; पारनेर येथे अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक
- चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय सचिव संजय जाजू यांच्या प्रमुख उपस्थितीत आज होणार संपन्न
- सोयाबीनच्या आगमनाने सुर्यफुलाचे दर्शन दुर्मिळ
- बीड प्रकरणातील दोषींना थारा दिला जाणार नाही : अजित पवार