इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन जाणारा मालवाहू ट्रक पेटला

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन जाणारा मालवाहू ट्रकने पेट घेतल्याची घटना संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे घडली आहे.

सोमवारी दिनांक २९ मार्च रोजी सकाळी ८ वाजता ही घटना घडली. या ट्रकमध्ये लॅपटॉपसह इलेक्ट्रॉनिक साहित्य होते.

हे साहित्य अजळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मालवाहू ट्रक हीच्यावरील चालक विजय नारायण डुबे हा पुणे येथून

लॅपटॉपसह आदि साहित्य घेवून गुडगाव हरियाणाकडे जात असताना वडगाव फाट्यावर आला असता या मालवाहू ट्रकने अचानक पेट घेतला.

चालकाने सावधानता बाळगत हा ट्रक शेताजवळ नेला. यावेळी परिसरातील आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला.

मात्र यामधील साहित्य जळून गेले होते. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News