अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील करोना रूग्ण वाढत असल्याने जनता कर्फ्युचा घेण्यात निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह नेवासा तालुक्यात करोना रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
यामुळे अखेर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामपंचायतचे मार्गदर्शक श्री चांगदेव मोटे व शिंगणापूर पोलिस स्टेशनचे पी.आय.बागुल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली व या बैठकीत जनता कर्फ्यू घेण्याचे ठरविले.
जाणून घ्या बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले.
- १) मंगळवार ते शुक्रवार वैदयकिय सेवा, औषधालय(मेडिकल), बँक वगळता संपूर्ण गाव कड़कड़ित बंद. जनता कर्फ्यु
- २) शनिवार पासुन सर्व दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 वा .पर्यंत उघडी राहणार.
- ३) प्रत्येकाने मास्क वापरने बंधनकारक
- ४) दैनंदिन वापरामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा वापर करणे.
- ५) ५ पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊं नये. कलम 144 लागु. दरम्यान, आपल्या शेजारी करोनाचा रुग्ण आढळल्यास त्वरीत ग्रामपंचायतशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|