अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-जिल्ह्यात व लगतच्या जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक आदेशांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.
मात्र तरीही जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येत आहे.
कोरोनाला अटकाव करण्यासाठी नुकतेच कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे झगडे फाटा चौफुलीवर पोलीस प्रशासन व चांदेकसारे ग्रामपंचायतीने विना मास व विनाकारण फिरणाऱ्या नागरिकावर कारवाई करत दंड वसूल केला.
यावेळी माजी सरपंच केशवराव होन, हेड कॉन्स्टेबल सुभाष आव्हाड, श्री काळे, मलू होन, अर्जुन बोरावके पोपट अल्हाट आदी उपस्थित होते. धुलीवंदन असल्याने नागरिक व वाहन धारक विना माक्सचे प्रवास करताना आढळून आले.
या सर्वांना या टीमने अडवत समज दिली आणि आर्थिक दंडही वसूल केला. कोपरगाव तालुक्यात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे .
पोलीस प्रशासन व सरकार याबाबत कायम नागरिकांना सतर्क करीत आहे. मात्र काही ठिकाणी त्यांनी केलेल्या सूचनेचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे करोना आखणी फैलावू शकतो.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|