अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-आयएमएसच्या व्यवस्थापन विभागातील डॉ.राहुल खंडेलवाल यांना इन्स्टीट्युट ऑफ स्कॉलर,बँगलोरचा रिसर्च एक्सलन्स अँवार्ड २०२० मिळाला.
आयआयएम शिलॉंग येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी सादर केलेल्या “ रिसायकलिंग ऑफ वेस्ट आटोमोटिव्ह लुब्रीकेटींग आँईल “या शोध निबंधास संशोधनातील सर्वोत्तम पुरस्कार देण्यात आला.
या बद्दल संस्थेचे संचालक डॉ. एम.बी.मेहता यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ.मीरा कुलकर्णी उपस्थित होत्या. या परिषदेत विविध विषयावरील ८३ निबंध सादर करण्यात आले होते.
त्यातील निवडक २३ निबंधात खंडेलवाल यांच्या या शोध निबंधाचा समावेश होता.हा शोध निबंध ईम्राड पब्लिकेशनच्या आंतरराष्ट्रीय मासिकात प्रसिद्ध हि करण्यात आला आहे.
राहुल खंडेलवाल यांचा पारंपारिक व्यवसाय गाड्याशी निगडीत असून गाड्या मधील आँईलचा पुन्हा वापर कसा करता येईल या विषयी त्यांनी सखोल विचार व अभ्यास केला आहे.
त्यांच्या शोध निबंधात सुचविलेल्या पर्याया मुळे निसर्ग व पर्यावरण समतोल राखण्यास मदत होणार आहे.त्यांना मिळालेल्या या पुरस्कारा बद्दल बिपीएचई सोसायटीचे सर्व पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
आयएमएसचे डॉ.राहुल खंडेलवाल यांनी आजपर्यंत इंडियन ऑफ मँनेजमेट आयोजित १२ आंतरराष्ट्रीय परिषदेत शोध निबंध सादर केले आहेत.
नवी दिल्ली मानव संशोधन विभागातर्फे त्यांच्या दोन संशोधन प्रकल्पांना अनुदान प्राप्त झाले असून त्यावर ग्रामीण भागात कार्य हि सुरु आहे.जागतिक पातळीवर विविध विषयावर त्यांचे १४ शोध निबंध प्रसिद्ध हि झाले आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|