वाझेंच्या खुलाशाने पवारांना पोटदुखीचा त्रास !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना रविवारी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान करण्यात आले आहे पवारांच्या पित्ताशयावर बुधवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

यापार्श्वभूमीवर दिल्ली भाजपाचे मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदल यांनी शरद पवारांवर टीका केली.

वाझेंनी एनआयएकडे केलेल्या खुलाशांमुळे पवारांना पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याचा टोला जिंदल यांनी लगावला आहे.

नवीन जिंदल यांनी पवारांच्या पोटदुखीच्या त्रासाचा संबंध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं भरलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात एनआयएने अटक केलेल्या सचिन वाझेंसोबत जोडला.

“सचिन वाझेने एनआयएसमोर असा कोणता खुलासा केला की, शरद पवार यांच्या अचानक पोटात दुखायला लागले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले.

आता तर असं वाटतंय की.दाल में कुछ कला नहीं बल्कि पूरी की पूरी दाल ही काली है”, असं ट्विट नवीन कुमार यांनी केलं.

याशिवाय, “पवारांच्या अचानक पोटदुखीमुळे पश्चिम बंगालआधी महाराष्ट्रातच सत्तांतर होईल असं का वाटतंय” असंही कुमार यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, जिंदल यांच्या सदर ट्वीटवर भाजपकडून अद्याप कुठलेही भाष्य करण्यात आलेले नाही.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe