श्रीरामपूर: प्रभात दूधचे सारंगधर निर्मळ यांच्या बंगल्यातील चोरीची घटना ताजी असतानाच खैरी निमगाव येथील सात घरांतून सोन्याच्या दागिन्यांसह लाखो रुपयांचा ऐवज चोरांनी लंपास केला. खैरी निमगाव येथील राजेंद्र ढोबळे हे पत्नी, मुलांसह दिवाळीत अंदरसुलला गेले होते.
चोरट्यांनी कटरने त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा कापून आत प्रवेश केला. उचकापाचक करत १२ तोळे सोन्याचे दागिने त्यांनी चोरून नेले. त्यांच्या शेजारी राहत असलेले माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे स्वीय सहायक अप्पासाहेब दुशिंग यांच्या घरातदेखील त्याच पद्धतीने प्रवेश करत दोन तोळे सोने आणि ४ हजार रुपये लांबवण्यात आले.

माजी तंटामुक्ती अध्यक्ष गोपीचंद भागडे यांच्या घरातील अडीच तोळे सोने आणि १२ हजार रुपये, भानुदास कचरू जाधव यांच्या घरात आवारातून प्रवेश करत संदीप जाधव यांच्या खिशातील पाकिटातून ७ हजार ३०० रुपये, मुलीच्या गळ्यातील ओम चोरट्यांनी लांबवला.
लीलाबाई पंढरीनाथ जोजे आणि देवराम तुपे यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा कटरने तोडून सामानाची उचकापाचक चोरांनी केली. घरी कोणी नसल्याने कितीची चोरी झाली हे समजू शकले नाही.
- 200MP कॅमेरा + 7600mAh बॅटरी! iQOO 15R चार वर्षे अगदी नवा राहणारा फोन !
- 7000mAh बॅटरी, 50MP ट्रिपल कॅमेरा, 100W फास्ट चार्जिंग, iQOO 15 वर धमाकेदार डिस्काउंट
- रेल्वेसाठी मोठा पॅकेज, वंदे भारत स्लीपर ट्रेनसह अमृत भारत रेल्वेचा विस्तार
- विजय सेल्समध्ये iPhone 16 आता अर्ध्या किमतीत-Limited Offer, एक्सचेंज आणि बँक डिस्काउंटसह उपलब्ध
- साध्या लोकलचे एसी लोकलमध्ये रूपांतर; तिकीट दर किती? आराखड्यासाठी आयआयटीची नियुक्ती













