अहमदनगर :- हे शहर माझे आणि आणि मी या शहराचा एक घटक आहे,असे मानले तरच आपण शहरचा चेहरा मोहरा बदलू शकतो. शहराचा विकास साधायचा असेल तर सर्वांनीच मिळून काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
आमदार संग्राम जगताप यांनी शहराच्या विकासाच्या दृष्टीने नुकतीच महनगरपालिका अधिकारी व पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन शहराच्या विकासासाठी नियोजन करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी महानगरपालिकेचे अतिक्रण विभागाचे उपअभियंता सुरेश इथापे, रिजवान शेख, अर्जुन जाधव, सुरेश मिसाळ, राहूल तनपुरे, शंकरराव औटी, दादा जाधव, साहेबराव गायकवाड, मच्छिंद्र कोर्हाळे, नसाळे, शिंदे, मोरे, पटेकर, बडेमिया आदीसह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार जगताप यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आमदार जगताप म्हणाले, शहरातील रस्ते रुंदीकरण, युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी एमआयडसी येथे छोटे उद्योग, व्यापारपेठेत नवीन उद्योगांना चालना मिळण्यासाठी रुंदीकरण हा प्रश्न हाती घेणार आहे.
- Penny Stocks 2025 : 1 रुपयांच्या शेअरमध्ये तुफान तेजी, गुंतवणूकदारांची मोठी कमाई …
- Oneplus Open Offer : वनप्लसचा फोल्डेबल मोबाईल झाला स्वस्त ! तब्बल चाळीस हजार…
- जिओ फायनान्शिअलच्या शेअरबद्दल महत्वाची अपडेट ! शेअर लवकरच ₹300 च्या वर…
- iPhone वापरणाऱ्यांसाठी खास माहिती ! वाचा ‘i’चा अर्थ काय होतो ?
- राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! PM Kisan Yojana नियमांमध्ये बदल होणार