अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी चौफुली येथे झालेल्या अपघातात शेवगाव तालुक्यातील बोधेगाव पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस कॉन्स्टेबल संपत एकशिंगे यांचे निधन झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेवगाव पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या बोधेगाव दूरक्षेत्र येथे कार्यरत असलेले पोकॉ.
संपत एकशिंगे हे आज मंगळवारी दुपारी बोधेगाव येथून पाथर्डीकडे दुचाकीवरून जात होते. ते पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी चौफुली येथून पाथर्डीकडे जात असतांना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला.
या अपघातात त्यांचा दुदैवी मृत्यू झाला. त्यांच्या निधनाचे वृत्त बोधेगाव व परिसरात कळताच हळहळ व्यक्त केली जात आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|