अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-गेल्या महिन्याभरापासून सर्वांनाच धडकी भरवणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत सोमवारी आिण मंगळवारी घट झाली आहे.
२४ तासांत राज्यात २७ हजार ९१८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर २३ हजार ८२० जण कोरोनामुक्त झाले. दोन दिवसांत या आकड्यात १२ हजारांनी घट झाली आहे.
राज्यात सोमवारी दिवसभरात कोरोनाचे ३१ हजार ६४३ नवे रुग्ण वाढले होते. तत्पूर्वी रविवारी ४० हजाराहून अधिक रुग्ण आढळले होते.
तर शनिवारी राज्यात ३५ हजार ७२६ नवे रुग्ण वाढले होते. मात्र गेले दोन दिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.
त्यामुळे प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधितांचा २७ लाख ७३ हजार ४३६ वर पोहोचला आहे.
आतापर्यंत २३ लाख ७७ हजार १२७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ५४ हजार ४२२ जणांचा मृत्यू झाला आहे.
सध्याच्या घडीला राज्यात ३ लाख ४० हजार ५४२ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|