अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव ग्रामपंचायतीमध्ये नव्याने पदभार स्विकारलेल्या सरपंच कमिटीच्यावतीने गावात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.
31 मार्चपर्यंत आतापर्यंतची सर्व व पुढील वर्षाची आगाऊ घरपट्टी व पाणीपट्टी भरा व मोफत दळण दळून न्या, असा कर वसुलीचा अजब फंडा तालुक्यात ग्रामपंचायतीने काढला आहे.
सरपंच सागर मुठे यांच्या कमिटीने गावात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास सुरुवात केली असून या उपक्रमाद्वारे गावात विविध योजना येणार असून या सर्व योजनांच्या अंमलबजावणीसाठी गावातील नागरिकांनी सहकार्य करावे,
असे आवाहनही सरपंच मुठे यांनी केले आहे. यामध्ये 31 मार्च 2021 पर्यंत घरपट्टी व पाणीपट्टी शंभर टक्के भरलेली असावी.
शिवाय 31 मार्च 2022 पर्यंत हा कर आगाऊ भरलेला असावा, दुसर्या योजनेत एटीएम मशीनद्वारे नियमित कर भणार्यांसाठी पाच रुपयांत 20 लिटर शुद्ध पाणी, थकबाकी असणार्या व्यक्तींना अवघे 10 लिटर शुद्ध पाणी मिळेल.
मुक्तीचे ग्रामपंचायतीने गिरणही खरेदी केली असून या सर्वअटींची पूर्तता करणार्या कुटुंबाना 1 मे पासून योजनेचा लाभ घेता येणार आहे.
या गावात 600 कुटुंब असून 2829 लोकसंख्या आहे. ग्रामपंचायतीने राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे आदर्श गाव होण्याकडे मुठेवाडगाव ग्रामपंचायतीची वाटचाल सुरू आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|