पारनेर :- कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून साबळेवाडी येथील शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केली. बाळू सुखदेव चाटे (वय ५०) यांनी शेतीसाठी बँकांकडून कर्ज घेतले होते. गेल्या वर्षी दुष्काळात त्यांचे उसाचे पीक जळाले.
यावर्षी अतिवृष्टीने शेतातील पिके वाया गेल्याने बँकांचे कर्ज भरता आले नाही. त्यामुळे त्यांना नैराश्य आले होते. त्यांनी २ ऑक्टोबरला विषप्राशन केले. त्यांना पुण्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारांपूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.

पाणी उपलब्ध असूनही शेतीमालाला भाव नाही, म्हणून आत्महत्या करण्याची मानसिकता शेतकऱ्यांमध्ये वाढत आहे.
- अहिल्यानगर जिल्ह्यात चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ! १६ घरफोड्या, २४ लाखांचा मुद्देमाल….
- Ahilyanagar Breaking : अखेर नदीत बुडालेल्या महिलेचा मृतदेह आढळला
- भारताची स्वदेशी ‘धनुष’ तोफ बोफोर्सपेक्षा किती प्रगत आणि घातक? वाचा तिची वैशिष्ट्ये!
- पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गुड न्यूज ! Pune Metro च्या ताफ्यात ‘इतक्या’ नव्या गाड्या सामील, कोणत्या रूटवर चालवणार ?
- भारताव्यतिरिक्त ‘या’ 5 देशांतही राहतात सर्वाधिक हिंदू, एकूण आकडेवारी थक्क करणारी!