अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:- तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या आठ जणांना नेवासा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून रोकड-मोबाईलसह 1लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यामध्ये पोलिसांनी राहुल जनार्धन लाड (वय 28) रा. नेवासा फाटा, रशीद मुस्तफा शेख (वय 30), गणेश लक्ष्मण गायकवाड (वय 25), दत्तात्रय गोरख साळवे (वय 24), आकाश अनिल गायकवाड (वय 27), अदिनाथ शेटीबा धनवटे (वय 25),
इलेश संजय साळवे (वय 22), संदीप सुर्यभान धनगर (वय 27 ) सर्व रा. नेवासा फाटा असे असल्याचे सांगितले.
याप्रकरणी कॉन्स्टेबल गणेश लक्ष्मण इथापे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, 29 मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास नेवासाफाटा येथे छापा टाकला असता काही इसम हे गोल रिंगण करून पत्ते खेळताना मिळून आले.
तेव्हा त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एकूण 1 लाख 67 हजार 300 रुपये रक्कमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या सर्वांवर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे व पुढील तपास पोलीस नाईक श्री. तमनर करीत आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|