अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:- प्रेमसंबंध असलेल्या दोघांमध्ये वाद झाला व संबंधित व्यक्तीकडून पीडित महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाणीची धमकी देण्यात आली.
या प्रकरणी सदर पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या फिर्यादीवरून सचिन ज्ञानदेव काळे या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर शहरातील गणेशनगर येथील एका महिलेचे कोल्हेवाडी येथील सचिन काळे यांच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरु होते.
त्यातच १५ मार्च ते २७ मार्च दरम्यान आरोपी सचिन काळे याने सदर महिलेला तिच्या जातीवाचक शिवीगाळ करत मारहाणीची धमकी दिली. तसेच तुझ्यासोबत असलेले खासगी फोटो सोशियल मेडीयावर व्हायरल करील अशी धमकी दिली.
सतत होणाऱ्या या त्रासाला कंटाळून सदर महिलेने शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|