संगमनेर – संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्ष वयाच्या अल्पवयीन तरुण विद्यार्थिनीला उंबरी बाळापूर येथे राहणारा आरोपी अमोल राजेंद्र अंजनकर याने दि. २४ रोजी आश्वी – उंबरी रस्त्यावर विश्वासात घेवून त्याच्या पल्सर दुचाकीवर बसवून अल्पवयीन विद्यार्थिनीला पुणे रस्त्याने नेले.
चंदनापुरी घाटाच्या शिवारात एका लॉजवर नेवून तेथे लग्नाची अमिष दाखवून इच्छेविरुद्ध बळजबरीने बलात्कार केला व घडलेला लैगिक अत्याचाराचा प्रकार कोणाला सांगितला तर तुला व तुझ्या कुटुंबाला जिवे ठार मारील, अशी धमकी दिली.
पिडीत विद्यार्थिनीने घडलेला प्रकार घरी नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर काल थेट आश्वी पोलिसांत जावून पिडीत विद्यार्थिनीने फिर्याद दिल्यावरुन आरोपी अमोल राजेंद्र अंजनकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी संगमनेर विभागाचे डिवायएसपी पंडित, पोनि मांडवकर यांनी भेट दिली.
पोसई पाटील हे पुढील तपास करीत आहेत. या घटनेने पालक वर्गात व विद्यार्थिनींमध्ये खळबळ उडाली असून आरोपी विद्यार्थिनीच्या गावातीलच आहे. तिने धाडस दाखवून घडल्या प्रकाराबद्दल थेट पोलिसांत तक्रार दिली.
- चालून आली आयपीओत गुंतवणूक करून लाखो रुपये कमवण्याची संधी! गुंतवणूकदारांना लागेल लॉटरी
- महानगरपालिकेत सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांची नोंद करणे बंधनकारक! आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचे आवाहन
- Bank of Baroda Recruitment 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये 1267 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा
- वार्षिक पगार 15 लाख असलेल्यांसाठी जुना टॅक्स स्लॅब चांगला आहे की नवीन टॅक्स लॅब? जाणून घ्या दोघांचे फायदे
- पीएफ खात्यातून पैसे काढले तरी मिळेल का पेन्शन? जाणून घ्या फायद्याचे नियम