अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-नगर तालुक्यातील वाळकी येथील ओंकार बाबासाहेब भालसिंग या तरुणाच्या खूनप्रकरणातील तसेच मोक्का लावलेल्या गेल्या सहा महिन्यांपासून फरार असलेला आरोपी सुनील फक्कड अडसरे (वय २६ रा. शेडाळा, ता. आष्टी जि. बीड) याला सुपा या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
ओंकार भालसिंग याचा विश्वजीत कासार व त्याच्या टोळीने खून केला होता. त्या टोळीतील विश्वजीत कासार व त्याच्या चार साथीदारांना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे.
त्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे. या टोळीतील सुनील अडसरे हा गेल्या सहा महिन्यापासून फरार होता.
त्याचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना सदर आरोपी हा सुपा येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित ठिकाणी शोध घेतला असता सुनील अडसरे मिळून आला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|