अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-सचिन वाझे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरेंना रिपोर्टिंग करायचे. परमबीर सिंह यांना ते विचारायचे नाहीत. ते आदित्य ठाकरेंसोबत ऑनकॉल होते.
म्हणूनच त्यांना वाचवायचे प्रयत्न होत होते, असा धक्कादायक आरोप भाजप नितेश राणे यांनी केला आहे. एका मराठी वृत्तावाहिनीशी बोलताना राणे यांनी ठाकरे पितापुत्रांवर निशाणा साधला आहे.
राणे म्हणाले, सचिन वाझे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी राहत होते. ते ‘वर्षा’वर का राहायचे? वर्षा कुणाचं निवासस्थान आहे? वर्षावर राहायची परवानगी सचिन वाझेंना कुणी दिली होती?, असे सवालही राणे यांनी उपस्थित केले आहे.
मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास महाराष्ट्र एटीएस करत होती, परंतु त्यानंतर हा तपास NIA कडे वर्ग करण्यात आला. NIA मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांचे प्रकरण आणि मनसुख हिरेन यांची हत्या या दोन्हीचा तपास करत आहे,
NIA ने कोर्टात हे दोन्ही प्रकरण एकमेकांनी जोडले आहेत असं सांगितलं आहे. सचिन वाझेला ३ एप्रिलपर्यंत NIA कोठडी सुनावली आहे. ठाण्यातील मनसुख हिरेन यांची स्कोर्पिओ गाडी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर २५ फेब्रुवारी रोजी आढळली होती.
या गाडीत स्फोटकांनी भरलेल्या जिलेटिनच्या कांड्या सापडल्याने मोठी खळबळ उडाली. यानंतर ५ मार्च रोजी मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीकिनारी सापडला.
यात महाराष्ट्र एटीएसनं निलंबित पोलीस कर्मचारी विनायक शिंदे आणि नरेश गोर यांना अलीकडेच अटक केली होती.
एनआयएच्या माहितीप्रमाणे, तपास पथकाला १४ मोबाईल क्रमांक सापडले त्यातील ५ मोबाईल नंबर सचिन वाझेंना देण्यात आले होते.
यातील एका मोबाईल नंबरवरून सचिन वाझे मनसुख हिरेन यांच्या हत्येसाठी वापरत होता. मनसुख हिरेन यांच्या हत्येचा उलगडा होण्यापर्यंत NIA चा तपास पोहचला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|