अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-कोपरगाव तालुक्यातील १७ पाणीपुरवठा योजनांचे वीजबिल थकल्यामुळे वीजप्रवाह खंडित केल्याने पाणीपुरवठा बंद झाल्याच्या वृत्ताआडून माजी आमदारांनी विद्यमान आमदार काय करतात? असा सवाल केला, मात्र अर्धवट माहितीच्या आधारे दिलेले वृत्त चुकीचे असल्याचा खुलासा कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी केला आहे.
प्रसिद्धीपत्रकात रोहोम यांनी म्हटले आहे की, येसगाव, अंचलगाव, माहेगाव देशमुख, कुंभारी, हिंगणी, करंजी, मळेगाव थडी, कारवाडी, मंजूर, वेळापूर, चासनळी, हंडेवाडी, कोळगाव थडी, वडगाव, सडे, धोंडेवाडी आदी १६ गावातील १३ गावांचा पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरु आहे.
यापैकी वडगाव, सडे पाणी योजनांचा दोन दिवसांपूर्वी व धोंडेवाडी पाणी योजनेचा बारा दिवसांपूर्वी वीजप्रवाह खंडीत करण्यात आला आहे.
त्याबाबत नियोजन करून या योजनांचा वीजप्रवाह सुरळीत होईल; पण आधी आपण काय करतोय याचे मूल्यमापन करा व पूर्ण माहिती घेऊनच वक्तव्य करा, असे रोहोम यांनी शेवटी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|