अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-विरोधकांना मतदान केल्याच्या रागातून दारुच्या नशेत एका विवाहित महिलेला शस्त्र व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील गणेगाव येथे घडली आहे.
याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन प्रमोद प्रल्हाद कोबरणे, संदीप पोपट कोबरणे (दोघेही रा.ओहोळ वस्ती, गणेगाव) या दोघांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी कि, प्रमोद कोबरणे व संदीप कोबरणे दारु पिऊन घरी आले. घरासमोर उभ्या असलेल्या सासूबाईस, तुम्ही ग्रामपंचायत निवडणुकीत मला मतदान का केले नाही, अशी विचारणा केली.
त्यावर आपण त्यांना, आम्ही कोणालाही मतदान करतो आमचा अधिकार आहे, असे म्हणाल्याचा राग आला.
त्यावर त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केली तसेच, एकेकाचा काटा काढू, अशी धमकी दिली. यामुळे राहुरी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|