अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव परिसरात नवीन मराठी शाळेजवळ राहणारी विवाहित तरुणी सो. वैशाली संदीप झिंजुडे, वय २७ ही आठवडे बाजार असल्याने घरीच होता.
तेव्हा नवरा संदीप रोहिदास झिंजुर्डे हा दारु पिवून घरी आला व पत्नी वैशालीला म्हणाला की, मला दारू पिण्यासाठी पैसे दे आणि, तो तिला शिवोगाळ करु लागला.
तेव्हा सासू ताराबाई रोहिदास झिंजुडे व हेमा रामदास गुलर यांनी वैशालीला शिवीगाळ करुन तू त्याला पैसे दे असे म्हंटले तेव्हा वैशालीने पैसे देण्यास नकार दिला असता
वैशाली झिंजुर्डे या तरुणीला खाली पाडून एकाने पाय धरून एकाने हात धरुन तोंडात बळजबरीने स्टीलच्या ग्लासातुन विषारी औषध पाजले.
विषारी औषध पोटात गेल्याने वैशाली संदीप झिंजुर्डे हि विवाहिता बेशुद्ध झाली. तिला तातडीन श्रीरामपूर शहरातील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
ती शुद्धीवर आल्यानंतर वैशाली हिने नेवासा पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी नवरा संदीप रोहिदास झिंजु्डे,
ताराबाई रोहिदास झिंजु्डे दोघे रा. बेळपिंपळ्गाव, ता. नेवासा, हेमा रामदास गुलर रा. यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|