अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-कडाक्याचा उन्हाळा सुरु झाला कि अनेक ठिकाणी आगीच्या घडताना दिसून येतात. काही वेळा आग हि लावली जाते तर काही वेळा एखाद्याच्या चुकीमुळे हा वणवा पेटत असतो.
नुकतेच एका घाटात आग लागल्याची घटना जिल्ह्यात घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील एका शेतकर्याने बांधावरील काट्या जाळून टाकण्याचा प्रयत्न केला त्यानंतरच काही वेळाने त्या भागात जंगलाला आग लागल्याची प्राथमिक चर्चा आहे.
सकाळी आठच्या सुमारास आग लागल्याचे वन विभागाच्या अधिकार्यांना समजलले. त्यानंतर त्यांनी आग विझवण्याच्या मशीनसह विविध भागातील कर्मचार्यांना घटनास्थळी बोलून घेत
स्थानिक तरुणांना मदतीला घेऊन वार्यासह कडक उन्हाच्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करत सायंकाळी आठ वाजता ही आग विझवण्यात वन विभागाला यश आले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|